S M L

'कृष्णकुंज'वर राज ठाकरे आणि मनसे शिलेदारांमध्ये पहिल्यांदाच खडाजंगी

शिलेदारांनी पराभवाचं खापर राज ठाकरेंवर फोडलं तर राज ठाकरेंनी शिलेदारांवर फोडलं.

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 04:44 PM IST

'कृष्णकुंज'वर राज ठाकरे आणि मनसे शिलेदारांमध्ये पहिल्यांदाच खडाजंगी

20 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी कृष्णकुंजवर पहिल्यांदाच मनसे शिलेदारांनी 'आवाज' वाढवला. शिलेदारांनी पराभवाचं खापर राज ठाकरेंवर फोडलं तर राज ठाकरेंनी शिलेदारांवर फोडलं.

मुंबईत झालेल्या मनसेच्या बैठकीत राज ठाकरे आणि मनसे नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. पक्षाला मिळालेलं अपयश यावरून नेते आणि राज ठाकरेंमध्ये पहिल्यांदाच वाद झाला. महापालिका निवडणुकीत पराभवाचं खापर राज ठाकरेंनी नेत्यांवर फोडलं. मात्र नेत्यांनी या पराभवाला राज ठाकरे  जबाबदार असल्याचं सांगितलं. त्यामुळे राज आणि मनसे नेते यांच्यात जोरदार तूतूमैमै झाल्याची चर्चा आहे.

आत्मचिंतन बैठकीत ही खडाजंगी झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र मनसे नेते यासंदर्भात सारवासारव करताना दिसतात. मराठी माणसाच्या मुद्यावरून हा वाद झाल्याची माहिती कळतेय. मनसेच्या इतिसाहास पहिल्यांदाच नेत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत अशी वादावादी झाल्याची माहिती कळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 04:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close