राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर

राज ठाकरे आणि आशिष शेलार एकाच मंचावर

प्रकाश मोहाडीकर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्ताने पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र आले होते.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 09 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे आज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबईतल्या दादर इथं ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्ताने पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र आले होते.

प्रकाशभाई मोहाडीकर हे दादर येथील सानेगुरुजी विद्यालय शाळेचे संस्थापक होते. त्यांच्या जयंती निमित्ताने अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी शाळेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सुधीर जोशी आणि शिवसेनेचे माजी राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत हेही उपस्थित होते.यावेळी पोस्ट खात्याने  मोहाडीकर यांचे तिकीट आणि पाकीट काढून गौरव केला आहे.

तर राज ठाकरे यांनी मोहाडीकर यांच्या पुतळ्याबद्दल नाराजी व्यक्त केली. "पुतळ्यामध्ये त्यांचा प्रभाव दिसून येत नाही, त्यामुळे काही दिवसांमध्ये नवीन पुतळा तयार करून देईन", असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं आहे.

मागील महिन्यात 31 डिसेंबर रोजी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊ भेट घेतली होती. तब्बल दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. राज यांचा मुलगा अमित ठाकरे याचा विवाहसोहळा या महिन्यात आहे. या लग्नसोहळ्याला भाजपच्या कोणकोणत्या नेत्याला निमंत्रण द्यायचं याबाबत ही भेट झाली होती. या भेटीनंतर आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते.

First Published: Jan 9, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading