मोर्चा मोहम्मद अली रोडवरूनच नेणार, मनसेच्या भूमिकेमुळे पेच वाढणार

मोर्चा मोहम्मद अली रोडवरूनच नेणार, मनसेच्या भूमिकेमुळे पेच वाढणार

मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई, 29 जानेवारी : 'बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,' या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्चाबाबत मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी मनसे नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास मनसे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे.

गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

मुस्लीम बहुल भागातून मनसे सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चा काढणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. याबाबत आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मनसेनी मोर्चाबाबत काय मागणी केली, त्याबाबत पोलीस बघतील आणि विचार करून निर्णय घेईल,' असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 23 जानेवारीच्या महामेळाव्यात पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आक्रमक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर राज यांचा CAA आणि NRCला पाठिंबा आहे असं बोललं जात होतं. घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी नुकतीच कृष्णकुंजवर बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांना नव्या भूमिकेवरून उपस्थित होत असल्याचं सांगितलं त्यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं.

पती शहीद झाल्यानंतर वीरपत्नी जे बोलली ते ऐकून तुमचाही संताप अनावर होईल...

मनसेचा मोर्चा हा CAA आणि NRCच्या समर्थनासाठी नाही असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावर चर्चा होऊ शकते मात्र समर्थन होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. नव्या भूमिकेमुळे राज ठाकरे हे भाजपच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आपण भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जात नाही हेच राज ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 09:35 PM IST

ताज्या बातम्या