गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचा ट्रेंड, भाजपचा विजय झाला तर ईव्हीएमचा करिश्मा - राज ठाकरे

गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचा ट्रेंड, भाजपचा विजय झाला तर ईव्हीएमचा करिश्मा - राज ठाकरे

"विरोधक कधी जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास जेव्हा उडायला लागतो. तेव्हा सत्ताधाऱ्यांचा पराभव होतो"

  • Share this:

27 आॅक्टोबर : गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचा ट्रेंड आहे. उद्या जर गुजरातचा मोठा विजय झाला तर हा करिश्मा ईव्हीएम मशीनचा असेल असा संशय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. तसंच  फेरीवाल्यांकडून पोलिसांना 2 हजार कोटींचा हफ्ता मिळतोय असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नगरसेवकांबद्दल चिंता नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक फुटल्यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केलाय. कल्याण डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक आणि सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन केडीएमसीमधल्या नगरसेवकांपद्दल चिंता नाही असं स्पष्ट केलं.

त्यानंतर त्यांनी फेरीवाले हटवा आंदोलनावर प्रशासनावर टीका केलीये. आमच्या आंदोलनानंतर रेल्वे स्टेशन फेरीवाले मुक्त झाले. पण आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केलं म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले. याबद्दल कुणी काही बोलत नाही. मलाच विचारलं जातंय की तुमच्या आंदोलनानंतर फेरीवाले पुन्हा बसले ?, आंदोलन करणे आमचं काम आहे. फेरीवाले पुन्हा बसू न देणे हे प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाला याबद्दल कुणी जाब विचारत नाही.  फेरीवाल्यांकडून पोलिसांना कोट्यवधींचा हप्ता मिळतो. हा हप्ता वर्षांला 2 हजार कोटी इतका आहे मग फेरीवालेमुक्त स्टेशन कसे होणार असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

गुजरातमध्ये काँग्रेसचा ट्रेंड

विरोधक कधी जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास जेव्हा उडायला लागतो. तेव्हा सत्ताधाऱ्यांचा पराभव होतो. साडेतीन वर्षांपूर्वी हेच झालं होतं. तेव्हा मोदींच्या विजयामध्ये राहुल गांधींचा 50 टक्के वाटा होता. ज्या प्रकारे राहुल गांधींची टिंगल टवाळकी केली गेली त्यामुळे राहुल गांधी नको, नरेंद्र मोदी बरे असा म्हणणारा 50 टक्के गट होता. आणि उर्वरीत 50 टक्क्यामध्ये 15 टक्के सोशल मीडिया आणि मोदींनी दाखवलेली स्वप्न अशा गटाचा समावेश होता. आता गुजरातमधून जशा बातम्या येत आहे. त्यावरून काँग्रेसच्या बाजूने ट्रेंड आहे.  जर उद्या भाजपच्या बाजूने निकाल आला तर त्याच ईव्हीएम मशीनचा मोठा भाग असेल असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला.

वांद्र्याच्या झोपडपट्टीत बांगलादेशी

वांद्र्यात लागेली आग ही लावली जात आहे. ती तेथे सगळे बांगलादेशी आहे. पूर्वी तिथे काही झोपड्या नव्हत्या. आता त्या वाढत वाढत दोन मजली, तीन मजली झाल्या आहे. या सगळ्या प्रशासनाच्या समोर वाढल्या आहेत. बांगलादेशी वाढत असेल तर प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही. यांना जर काढायचं ठरलं तर पोलिसांना फक्त 48 तास द्या हे क्षणात साफ करून देतील असंही राज ठाकरे म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 08:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading