दाऊदला भारतात यायचंय, पण मोदी त्याचेही श्रेय घेणार- राज ठाकरे

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमला भारतात यायचं असून त्याची त्यासंबंधी केंद्र सरकारसोबत बोलणी सुरु आहेत. मोदी सरकार मात्र, त्याचंही श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात आहे. असा सणसणाटी गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केलाय. आज त्यांनी स्वतःचं फेसबुक पेज लॉन्च केलं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2017 02:08 PM IST

दाऊदला भारतात यायचंय, पण मोदी त्याचेही श्रेय घेणार- राज ठाकरे

मुंबई, 21 सप्टेंबर : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमला भारतात यायचं असून त्याची त्यासंबंधी केंद्र सरकारसोबत बोलणी सुरु आहेत. मोदी सरकार मात्र, त्याचंही श्रेय लाटण्याच्या प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात आहे. असा सणसणाटी गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केलाय. आज त्यांनी स्वतःचं फेसबुक पेज लॉन्च केलं. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदींवर प्रथमच आक्रमक भाषेत टीका केली. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईचं आर्थिक महत्व कमी करू इच्छितात, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरील 48 टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊंट्सवरील 54 अकाऊंट्स ही फेक असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. भाजपचं सरकार हे खरंतर सोशल मीडियावर खोटा प्रचार करून सत्तेवर आलं, पण हाच सोशल मीडिया अंगावर येताच भाजपला सोशल मीडियावरचा प्रचार आता अपप्रचार कसा वाटू लागलाय, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

मोदींवर टीका करतानाच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवरही घसरले, नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई आणि मराठी माणसांचं नुकसान करू पाहताहेत. तरीही भाजपमधले मराठी नेते हुजरेगिरीतच धन्यता मानताहेत, असा सवालही त्यांनी विचारलाय. तिकडे सिंधुर्दुगात भाजपने एकाचा फूटबॉल करून टाकल्याचा टोमणा मारत राज ठाकरेंनी नारायण राणेंवरही नाव न घेता टीका केली.

राज ठाकरेंच्या या फेसबुक पेजला अवघ्या तासाभरातच तब्बल साडेचार लाख फॉलोअर्सनी लाईक केल्याने हे अकाऊंट लगेच व्हेरिफाईडही झालंय. फेसबुक पेज लॉन्चिंग सोबतच राज ठाकरेंनी मनसेचा व्हॉट्सॲप क्रमांक : 7666662673 ही जाहीर केलाय. फेसबुक पेजच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणं आणि कामं लोकांपर्यंत पोहचू असंही ही राज ठाकरेंनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...