Home /News /mumbai /

पॉर्नमधूम मिळालेले पैसे लावायचा बेटिंगवर; राज कुंद्राच्या नव्या उद्योगांची माहिती पोलिसांनी केली उघड

पॉर्नमधूम मिळालेले पैसे लावायचा बेटिंगवर; राज कुंद्राच्या नव्या उद्योगांची माहिती पोलिसांनी केली उघड

पॉर्न व्हिडिओ करून मिळालेले पैसे राज कुंद्रा बेटिंगवर (Online Betting) लावत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

    मुंबई, 23 जुलै: सॉफ्ट पॉर्न (Soft Porn) प्रकरणात अटक केलेला उद्योगपती राज कुंद्राच्या (Raj Kundra) आर्थिक व्यवहारांचे नवे धागेदोरे (New links in economic transactions) पोलिसांना मिळाले आहेत. पॉर्न व्हिडिओ करून मिळालेले पैसे राज कुंद्रा बेटिंगवर (Online Betting) लावत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी समोर आलेले बँकेचे व्यवहार आणि इतर पुरावे (Proofs) यांचा तपास करण्यासाठी राज कुंद्राची पोलीस कोठडी (Police Custody) वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. काय आहे प्रकरण उद्योगपती राज कुंद्रा हा सॉफ्ट पॉर्न व्हिडिओ तयार करून वेगवेगळ्या कंपन्यांना विकत असे. या व्यवहारातून मिळालेले पैसे तो ऑनलाईन बेटिंगसाठी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. राज कुंद्राचं येस बँकेतील खातं आणि बँक ऑफ अफ्रिकामधील खातं यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले आहेत. पॉर्न व्हिडिओ विकल्यानंतर राज कुंद्राला मिळणारे पैसे हे येस बँकेतील त्याच्या खात्यात जमा होत असत. ते पैसे तो बँक अफ्रिकामधील स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असे. त्या खात्यातून हे पैसे ऑनलाईन बेटिंगसाठी वापरले जात असत. त्यातून कधी त्याचा फायदा होत असे, तर कधी नुकसान होत असे. त्याचं येस बँकेतील खातं हे पॉर्न व्हिडिओबाबतच्या व्यवहारांशी संबंधित आहे, तर त्याचं बँक ऑफ अफ्रिकाचं खातं बेटिंगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोन खात्यांमध्ये नेमके किती कोटींचे व्यवहार झाले, त्यात काही करचोरी झाली का आणि इतर काही अनियमितता त्यात आढळून येते का, याबाबतची माहिती घेण्यासाठी राज कुंद्राची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. हे वाचा-राज कुंद्राचं नव्हे हे बॉलिवूड कलाकारही पॉर्नोग्राफी करून झाले कोट्यधीश राज कुंद्राची पोलीस कोठडी 23 जुलै रोजी संपत असल्यामुळे ती वाढवून देण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली असून त्याच्या पोलीस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bollywood, Politics, Porn video, Raj kundra, Shilpa shetty

    पुढील बातम्या