PHOTOS: अमितच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेल्या राज ठाकरेंच्या आठवणी आजही मातोश्रीत

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर जरी पडले असले तरी आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री'वर त्यांचं वास्तव्य अबाधीत आहे.

  • Share this:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असणाऱ्या मातोश्रीवर गेले आहेत. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्ष झाली. पण मातोश्रीवर त्यांच्या वास्तव्याच्या खानाखुणाआजही जशाच तशा आहे. मातोश्रीवर राज ठाकरे यांचे जुने फोटो आजही पाहण्यास मिळतात.

 'मातोश्री'त प्रवेश केल्यानंतर समोरच डिजीटल स्क्रिनवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोत बाळासाहेबांनी राज आणि उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे.

 असे अनेक फोटो आहेत ज्यात राज हे आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत आहे.

 एका जाहीर सभेतला हा फोटो आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हे राज यांना काही सुचना देत आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करून खास मातोश्रीच्या भींतीवर लावण्यात आला आहे.

राज ठाकरे हे नेहमी बाळासाहेब जिथे जात होते तिथे त्यांच्यासोबत असत. असाच एक फोटो ज्यामध्ये सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यासह राज ठाकरे दिसत आहे.

असाच एक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला, या फोटोमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या फोटोसमोर बाळासाहेब आणि राज ठाकरे उभे आहे.

 काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांची अॅजिओप्लास्टी झाली होती. तेव्हा राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना घरी सोडण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.

 त्यानंतर ऑक्टोबर 2012 नंतर उद्धव ठाकरे यांच्या अॅजिओप्लास्टीनंतर राज ठाकरे 'मातोश्री'च्या पायर्‍या चढले होते. निमित्त होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचं. पण या चर्चेमध्ये फक्त बाळासाहेब आणि राजचं नव्हते तर उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. तब्बल एक तास 42 मिनीटं हि चर्चा झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 06:09 PM IST

ताज्या बातम्या