दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने हादरतेय मुंबई

दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने हादरतेय मुंबई

एका स्वयंसेवी सस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून विदारक वास्तव समोर, मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे आव्हान कायम

  • Share this:

13 मे : दर महिन्याला सामूहिक बलात्काराच्या किंकाळीने मुंबई हादरत असल्याची चिंताजनक बाब वर्षभराच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मुंबईत 1 एप्रिल 2013 ते 30 मार्च 2017 पर्यंत सामूहिक बलात्काराचे तब्बल 11 गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेमुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे आव्हान कायम असल्याचं दिसून येत आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवूनही बलात्कार, छेडछाड, अश्लिल वर्तन, विनयभंग आणि हुंड्यासाठी छळ असे महिलांवर होणारे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे विदारक वास्तव पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर येत आहे.

मुंबई शहर हे महिला आणि मुलींसाठी सुरक्षित असल्याचा दावा नेहमीच पोलिसांकडून करण्यात येतो. वास्तव मात्र वेगळेच असून शहरातील तब्बल ३३ टक्के महिलांना मुंबई असुरक्षित वाटत आहे. ही धक्कादायक माहिती एका स्वयंसेवी सस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...