मुंबईत पाऊस सुरूच;चक्रीवादळाचा धोका नाही

मुंबईत पाऊस सुरूच;चक्रीवादळाचा धोका नाही

मुंबईत फक्त पाऊस पडतोय. वादळी वारे सध्या तरी वाहत नाहीयेत. मुंबईत काल रात्रभर पडलेल्या पावसाचे प्रमाण कुलाबा १४ मिलीमीटर आणि सांताक्रूझ ११.२० मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. ओखी वादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका आपत्कालीन विभाग २४ तास सज्ज ठेवण्यात आलाय

  • Share this:

05 डिसेंबर:  अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळ निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई परिसरात काल संध्याकाळपासून पाऊस सुरूच आहे. पण चांगली बाब ही आहे की कोकण किनारपट्टी असो किंवा मुंबई परिसर, चक्रीवादळापासून धोका नाहीये.

मुंबईत फक्त पाऊस पडतोय. वादळी वारे सध्या तरी वाहत नाहीयेत. मुंबईत काल रात्रभर पडलेल्या पावसाचे प्रमाण कुलाबा १४ मिलीमीटर आणि सांताक्रूझ ११.२० मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. ओखी वादळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका आपत्कालीन विभाग २४ तास सज्ज ठेवण्यात आलाय. कुठे ही कसलीही मदत लागल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी विषेश योजना तयार करण्यात आलीय. चिल्ल्यापिल्ल्यांसाठी खूशखबर ही की आज शाळांना सुट्टी देण्यात आलीये. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर परिसरात शाळांना सुट्टी देण्यात आलीये. ओखी चक्रीवादळ कालपासून गुजरातकडे सरकतंय. उद्या सकाळी ते सुरतवर धडकेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. सध्या कोणताही धोका नसला तरी प्रशासनानं बचाव यंत्रणा सज्ज ठेवलीये.

राज्य सरकार आणि मुंबई महापालिका या वादळापासून होणाऱ्या धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर चार दिवस असणंऱ्या या वादळाला मुळे प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्रास असलेल्या भरती मुले उंच लाटा येणार आहेत.  त्यामुळे किनाऱ्याच्या परिसरात सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. कोस्टल रोड तसेच शिवाजी पार्क येथे विशेष काळजी घेतली जात आहे. सहा डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असल्याने राज्यभरातून हजारोच्या संख्येत अनुयायी येत असतात. त्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी कोणालाही न जाऊ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशामक दल, पोलीस,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, नौदल यांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यातस तत्पर राहण्यास सांगितलं आहे. 5, 6 आणि 7 डिसेंबरला मध्यरात्री आणि सकाळी सच्चा चार मीटर उंचीच्या लाटा असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

तर दुसरीकडे  गुजरातकडे मार्गस्थ झालेल्या ओखी वादळामुळे कोकणात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी लागल्या. मात्र काल समुद्रात उंच लाटा आणि जोराचा वारा नसल्यामुळे किनारपट्टीचा भाग तसा शांत राहिला . रत्नागिरीच्या राजीवडा आणि मांडवी परिसरात भरतीचे पाणी रस्त्यावर आले होते तर सिंधुदुर्गात आचरा पिरावाडी भागातही पाण्याचं प्रमाण वाढलं होतं . मात्र रविवारच्या तुलनेत सोमवारी रात्री परिस्थिती आटोक्यात होती .

 

 

First published: December 5, 2017, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading