मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Red Alert Mumbai: पावसाचं धुमशान; मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

Red Alert Mumbai: पावसाचं धुमशान; मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

आज पावसानं मुंबई (Mumbai Rain) ला चांगलंच झोडपून काढलं आहे. पुढचे 3 ते 4 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज पावसानं मुंबई (Mumbai Rain) ला चांगलंच झोडपून काढलं आहे. पुढचे 3 ते 4 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज पावसानं मुंबई (Mumbai Rain) ला चांगलंच झोडपून काढलं आहे. पुढचे 3 ते 4 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 जून: आज पावसानं मुंबई (Mumbai Rain) ला चांगलंच झोडपून काढलं आहे. पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. हवामान विभागानं हा हाय अलर्ट दिला आहे. पुढचे 3 ते 4 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रतितास 2 ते 3 सेंटीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गेल्या तीन तासात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. सांताक्रूझमध्ये 164.8 मिमी, कुलाबामध्ये 32.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण किनारपट्टीच्या (coastal strip)काही जिल्ह्यांसाठी यलो आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसाठी रेड अलर्ट आणि पुढील 4 दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी येथे पुढील चार दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडी मुंबईच्या शुभांगी भुते यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री कंट्रोल रुममध्ये

मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये (BMC control room) पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्यात. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. दुपारी 3.10 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

First published:

Tags: Mumbai News, Mumbai rain, Rain