मुंबई,28 ऑगस्ट :मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. आज पहाटेपासूनच पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस पडतो आहे.
दहिसर , बोरिवली , अंधेरी , दादर परिसरात जोरदार पाऊस पडतो आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. गेल्या 24 तासात मुंबई शहरात ५१.४३ मिमी पास पडला आहे. तर पूर्व उपनगरात ५४.५१ मिमी आणि पश्चिम उपनगरात ५२.५७ मिमी पाऊस पडला आहे. येत्या २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला जातो आहे.
आज मुंबईत भरती दुपारी ४.०५ मिनीटांनी भरती आहे. ३.५० मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.