मुंबईसह कोकण परिसरात जुलैसारखा पाऊस; हवामान विभागाने दिला अलर्ट!

मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्रने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मुंबईसह कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 06:12 PM IST

मुंबईसह कोकण परिसरात जुलैसारखा पाऊस; हवामान विभागाने दिला अलर्ट!

मुंबई, 03 सप्टेंबर: गणरायाच्या स्वागतासोबत राज्यात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. विशेषत: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतील कुलाबा येथील हवामान केंद्रने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात मुंबईसह कोकण परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस असल्यानं मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टीवर चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपती बप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. पहाटेपासून पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान पाऊसाचा जोर कमी व्हावा यासाठी भाविक गणरायाकडे प्रार्थना करत आहेत. पण सकाळपासून पावसाचा जोर वाढतच चालला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील किनारपट्टीभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हपूर, सातारा, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये आजही पावसानं दडी मारली असल्यानं बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात मुसळधार पाऊस पडून दे आणि दुष्काळ दूर होऊदे असं गणरायाला राजकारणी नेत्यांपासून भाविकांपर्यंत सर्वांनी साकडं घातलं आहे.

मुंबई, कोकण, विदर्भ, छत्तीसगड, गोवा या भागांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता.

गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मुसळदार पावसाने दमदार हजेरी लावली. दोन तास सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव भागात पाणी साचलं. या तालुक्यात असलेल्या केशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरच्या पुलावरून २ ते ३ फूट पाणी असल्यानं नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे पुलावरील वाहतूकही बंद झाली असून चार गावांचा संपर्क तुटलेला आहे.

Loading...

VIDEO :...त्यात वावगं काय? मुनगंटीवार यांचा रोहित पवारांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...