मुंबईत पुढील 24 तास कोसळधार; जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर! Mumbai Weather | Mumbai Rains | Rain

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 24 तासापासून पावसाची हजेरी लावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 02:20 PM IST

मुंबईत पुढील 24 तास कोसळधार; जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर! Mumbai Weather | Mumbai Rains | Rain

मुंबई, 29 जून: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 24 तासापासून पावसाची हजेरी लावली आहे. एका बाजूला पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांच्या अचडणी देखील वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात सुरु झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतली नाही. त्यामुळे अनके सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली आहे. अर्थात मुंबईकरांना होणाऱ्या या अडचणीचा सामना आणखी 24 ते 48 तास करावा लागू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. हवेचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. तर 4 जुलैनंतर पुन्हा एकदा उत्तर कोकणात पावसाला सुरुवात होऊ शकते. स्कायमेटच्या अंदानानुसार बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पावसाची शक्यता आहे.

लोकल सेवा विस्कळीत...

शुक्रवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे, पश्चिम रेल्वेच्या 10 ते 15 मिनिटे तर हार्बर मार्गावरील गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे सोबत रस्ते वाहतूक ही धीम्या गतीने सुरु आहे. विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म खचल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-शीळ फाटा रोडवर ट्रॅफिक जाम झाल्यामुळे या मार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पनवेल, नवी मुंबई आणि ठाण्याकडे जाण्यासाठी वाहनांना वेळ लागत आहे. मुंबई शहरासह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मालाड पश्चिमेकडील नजराज मार्केट, एशियन पेंट कंपनी, भांडुप वेस्ट, आर सिटी मॉल या ठिकाणी पाणी साचले आहे. हिंदमाता, अंधेरी सबवे, मालाड सबवे, साकीनाका, सायन, माटुंगा लेबर कँम्प, मिलन सबवे, नॅशनल कॉलेज या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पुण्यात मृत्यूचे तांडव; 15 जण ठार, ही आहेत मृतांची नावे

भिवंडीत पावसाचा जोर वाढला- संरक्षण भिंत कोसळळी आणि...

Loading...

मुंबईपाठोपाठ भिवंडीत देखील पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील दापोडे येथील तलावाची संरक्षण भिंत आणि जॉगिंग ट्रॅक शनिवारी सकाळी कोसळला. पाऊस सुरु असल्यामुळे जॉगिंगसाठी कोणी आले नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. काही दिवासंपूर्वी 75 लाख रुपये खर्च करून ही संरक्षण भिंत आणि जॉगिंग ट्रॅक बांधला होता. याचे अद्याप उदघाटन देखील झाले नव्हते.

इतका पाणी साठा...

गेल्या 24 तासापासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण आणि तलावामध्ये पाणीसाठा वाढला आहे. तानसामध्ये 60 मिमी, विहार 209 मिमी, तुळशी 143 मिमी, मध्य वैतरणा 78 मिमी तर मोडकसागरमध्ये 69 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शॉर्टसर्किट आणि झाडे पडली...

मुंबई शहरात 11, पूर्व उपनगरात 18 तर पश्चिम उपनगरात 24 अशा एकूण 53 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. शहर आणि दोन्ही उपनगरात मिळून 14 ठिकाणी शॉटसर्किटच्या घटना घडल्या आहेत.

24 तासात झाला इतका पाऊस

गेल्या 24 तासात मुंबई शहरात 133 मिमी, पूर्व उपनगरात 208 मिमी तर पश्चिम उपनगरात 187 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर आणि उपनगरात मिळून 14 ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे.

अद्याप पुरेसा पाऊस नाही

मुंबईत गेल्या 24 तासापासून पाऊस सुरु असला तरी धरणक्षेत्रात अद्याप पुरेशा पाऊस झालेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण आणि तलावात अवघे 0.4 टक्के इतकी पाण्याची वाढ झाली आहे. काल पाण्याची पातळी 4.91 टक्के इतकी होती ती आता 5.31 टक्क्यांवर पोहोचली आहे.

VIDEO: घाटकोपरमध्ये भिंत कोसळली, कारचं मोठं नुकसान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...