चाकरमानी त्रस्त, रिक्षावाले मस्त!

चाकरमानी त्रस्त, रिक्षावाले मस्त!

एकीकडे प्रवाशी मजल दर मजल करत ऑफिसकडे पोहचण्याचा प्रयत्न करत असताना, रिक्षावाल्यांच्या मुजोरीचाही त्यांना सामना करावा लागत आहे.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : जुलै महिना सुरू झाला आणि पावसाने आपलं रूप दाखवायला सुरूवात केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नव्या महिन्याच्या पहिल्याच पावसात पश्चिम रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने चाकरमान्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे प्रवाशी मजल दर मजल करत ऑफिसकडे पोहचण्याचा प्रयत्न करत असताना, रिक्षावाल्यांच्या मुजोरीचाही त्यांना सामना करावा लागत आहे.

हेही वाचा

पूल कोसळून पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत, जाणून घ्या या महत्त्वाच्या 10 गोष्टी

पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, या मार्गांवरून करू शकता प्रवास !

तुमच्या खिशातली पाचशेची नोट खरी आहे की खोटी ?

जोगेश्वरी- अंधेरीदरम्यान पुलाचा काही भाग कोसळल्याने प्रवाशी अंधेरी स्थानकापर्यंत रुळांवरून चालत गेले. अखेर रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांनी रिक्षाने ऑफिसला जाण्याचा मार्ग निवडला. पण रिक्षावाल्यांनी त्यांची नड ऐकून प्रवाशांनी अव्वाचा सव्वा भाव सांगायला सुरूवात केली. अंधेरीपासून वांद्रेपर्यंत शेअरिंग रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. साधारणतः अंधेरी ते वांद्रे एकट्याने रिक्षाने प्रवास केला तर १५० रुपयांपर्यंत खर्च होतो. पण आज मात्र रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येकी १०० रुपये घेतले. त्यामुळे जो प्रवास १५० रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी ३०० रुपयांची मागणी केली. ऑफिसला लवकर पोहचण्याच्या आशेने प्रवाशांनी ती किंमत दिलीही. त्यामुळे प्रवाशी जेव्हा त्रस्त होतात तेव्हा रिक्षावाले मस्त होतात असेच म्हणावे लागेल.

दरम्यान, मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. आता वांद्रे ते चर्चगेट रेल्वे सुरू करण्यात आली असून अंधेरी ते विरारदरम्यानची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. अग्निशमन दल तसेच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या घटनेत सहाजण जखमी असून दोघांची प्रकृती चिंताग्रस्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading