मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Forecast: मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस, 9 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Weather Forecast: मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस, 9 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होतं आहे.

सध्या राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होतं आहे.

Weather Forecast: ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी (Monsoon In Maharashtra) पोषक हवामान तयार होतं आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 15 ऑगस्ट: ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर आता राज्यात मान्सूनसाठी (Monsoon In Maharashtra) पोषक हवामान तयार होतं आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain in Maharashtra) कोसळल्या आहेत. आजही कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD Forecast) वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन-तीन दिवसात राज्यात मान्सून सुरळीत होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी राज्यात हवामान खात्याकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही. आज महाराष्ट्रात मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढील चार दिवस राज्यात कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती राहणार आहे. हेही वाचा-पुणेकरांची चिंता वाढली; ग्रामीणपाठोपाठ आता शहरातही Delta Plusचा शिरकाव उद्या दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा गडगडाट अधिक असणार आहे. परिणामी विजा कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. हेही वाचा-केवळ धारावी नाही अख्ख्या मुंबईने जिंकला लढा,संपूर्ण मुंबापुरी कंटेनमेंट झोन फ्री मुंबईसह ठाण्यात पाऊस मागील सहा तासांपासून मुंबईसह, नवी मुंबई  आणि ठाण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.  ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पावसाचं प्रमाण अधिक होतं. याठिकाणी असंसत पद्धतीनं मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. सायंकाळनंतरही या भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मुंबई आणि ठाणे परिसराला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.
First published:

Tags: Maharashtra, Mumbai rain, Pune, Weather forecast

पुढील बातम्या