मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Weather Forecast: विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; मराठावाडा, विदर्भात हवामान खात्याकडून अलर्ट

Weather Forecast: विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; मराठावाडा, विदर्भात हवामान खात्याकडून अलर्ट

पुढील पाच दिवस पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील पाच दिवस पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Rain In Maharashtra: विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Possibilities After Weekend) हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी (Monsoon in Maharashtra) अनुकूल हवामान नसल्यानं पावसानं दडी मारली आहे. पुढील आणखी  तीन चार दिवस राज्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात मान्सूनची वापसी (Monsoon Comeback) होण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Possibilities After Weekend) हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा-मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ...तोपर्यंत हटणार नाहीत मुंबईतले कोरोना निर्बंध!

मंगळवारी देखील राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी देखील पुण्यासह एकूण चौदा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट दिला आहे. सध्या बिहार आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी दक्षिण मराठवाड्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

हेही वाचा-'लॉकडाऊन नको पण मुलांना घरूनच शिकू द्या', सायरस पूनावालांनी का दिला असा सल्ला?

काल पुणे शहरासाठी ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आजही मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 50-60 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Maharashtra, Weather forecast