मुंबईसह उपनगरात विजेच्या कडकडाटासह पावसाचं जोरदार आगमन

मुंबईसह उपनगरात विजेच्या कडकडाटासह पावसाचं जोरदार आगमन

आज पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे असह्य उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली.

  • Share this:

मुंबई, 07 जून : आज पहाटे मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे असह्य उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली.दरम्यान राज्यात पुढचे सहा दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलीय. उद्यापासून ते सोमवार ११ जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या सिंधुदुर्ग  आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, वर्तवण्यात आली आहे. ९ जून रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

१० आणि ११ जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. तर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्याचा महापालिकेने धसका घेतला आहे. जोरदार पाऊस पडल्यास करावयाच्या उपाययोजना बुधवारी पालिकेने जारी केल्या आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी व रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

First published: June 7, 2018, 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading