मुंबईत पावसाच्या सरींची हजेरी

मुंबईत पावसाच्या सरींची हजेरी

बोरिवली ते अंधेरी आणि दादरला,कुर्ल्याला पावसानं झोडपलं. शनिवारी रात्रीसह रविवारी रात्रीही मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावलीये.

  • Share this:

05 जून : मुंबईत आज पहाटे मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी  हजेरी लावलीये. बोरिवली ते अंधेरी आणि दादरला,कुर्ल्याला पावसानं झोडपलं. शनिवारी रात्रीसह रविवारी रात्रीही मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावलीये. बदलत्या हवामानामुळे संध्याकाळाच्या हवेत किंचितसा गारवा आला होता.

दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असतानाच उकाडा मात्र कायम होता. मुंबईकर मान्सूनपूर्व पावसासह घामाच्या धारांनी ओलेचिंब होत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतल्या वातावरणात हवामानात बदल होत आहेत. दुपार वगळता सकाळसह संध्याकाळी मुंबईवर ढग दाटून येत आहेत आणि अशाच काहीशा वातावरणामुळे मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी लागत आहे.

दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, मानखुर्दसह साकीनाका, मरोळ, अंधेरी, मालाडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मौसमी पावसाची वाटचाल वायव्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामच्या उर्वरित भागात, त्रिपुराच्या व आसामसह मेघालयाच्या बहुतांश भागात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 10:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading