मुंबई, 18 मे : मुंबईवर (Mumbai) आलेलं तौक्ते चक्रीवादळाचं (tauktae cyclone) संकट टळलं असलं तरी त्याचा प्रभाव आज दुसऱ्यादिवशीही कायम आहे. मुंबई आणि उपनागरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर 80 ते 90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी रात्रभर ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे झाडं कोसळून पडली. तर कुठे विज पुरवठा खंडीत झाला आहे. आज दुसऱ्यादिवशी सुद्धा पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. बोरीवली सांताक्रुझ, चेंबूर, मुलुंड, कुलाबा, मुलुंडसह संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता आहे. हवामानाचा हा अंदाज सकाळी 7 ते 10 पर्यंतचा आहे. मुंबई आणि उपनागरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईत चक्रीवादळामुळे शहरात 104 ये उपनगरात 114 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात 50 ते 60 किमी वेग नोंदवलं गेला
तर कुलाबा येथे 114 किमी वाऱ्याचा वेग नोंद झाली.
26 ठिकाणी भिंत, किंवा घराचा भाग पडला आहे तर
479 ठिकाणी झाड अथवा झाडाच्या फांद्या तुटण्याची नोंद झाली आहे. मढमध्ये जेटी बोट बुडण्याने 5 जण समुद्रात पडले होते
त्यापैकी 4 सुखरूप एक जण बुडल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. तर हाजी अलीजवळ 11 लहान बोटी बुडल्याची माहितीसमोर आली आहे.
तर, मुंबईजवळील वसईत चक्रीवादळात दोन जणांचा मृत्यू आणि एक जण जखमी झाला आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाबर पाडा येथे एका रिक्षावर झाड कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. तर दुसर्या घटनेत भोयदा पाडा येथे इमारतीच्या भिंतीची वीट डोक्यात पडून कॅन्टींग मध्ये काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला असून अलगु प्रसाद यादव असं त्याचं नाव आहे. वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.