Alert..7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील या भागात होणार वादळी पाऊस

Alert..7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान राज्यातील या भागात होणार वादळी पाऊस

राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर: राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिकसह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान असेल. तसेच मेघगर्जनेसह मुसळढार पावसाची शक्यता आहे.

नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती 11 ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि विजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, पत्र्याच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

नाशकात मुसळधार पावसाचा धुमाकूळ...

नाशकात मुसळधार पावसानं रविवारी दुपारी धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि कोसळधार पावसाने नाशिककरांना वेठीस धरले आहे. रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड, अस्थी विसर्जन कुंड पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रस्तावर पाणी आल्याने अनेक वाहनं पाण्याखाली गेली आहेत. गोदावरी नदी पात्रात अचानक वाढ झाल्याने एक मारुती कार वाहून गेली. तसेच एका स्विफ्ट कारला वाचवण्यात यश नागरिकांना यश आले आहे. शहरातील जुने नाशिक, द्वारका, शालीमार, इंदिरानगरसह विविध परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील सराफा भागातील रस्त्यांना नदीचे रुप आले असून अनेक दुकानांत पाणी शिरले आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाचे तीन बळी...

नाशिकमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात दोघांचा तर दिंडोरीत एकाचा मृत्यू झाला आहे. यमुना गांगोडे (वय-65, रा.दिंडोरी), भरत भले व हीराबाई सदगीर (रा.इगतपुरी) अशी मृतांची नावे आहेत. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथेही परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. रोझोद्यात ज्वारीचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालन्यात वीज पडून 3 ठार, 2 जखमी

जालन्यातील भागडे सावरगाव येथे वीज पडून 3 ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपार ही घटना घडली. सोयाबीन सोंगणीचे काम करत असताना शेतात काम करणाऱ्यांवर वीज कोसळली. मृतांमध्ये 2 महिलांसह 1 पुरुषाचा समावेश आहे.

जालना तालुक्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारात वीज कोसळून 3 जणांचा जागेवर मृत्यू झाला. गयाबाई नाईकनवरे, संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिला या घटनेत मृत्युमुखी पडली आहे. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे. सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी शेती गेलेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुलावरून तिघे गेले वाहून...

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे मोरगाव पुलावरून तिघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना पहाटे सव्वा पाच वाजेदरम्यान घडली. म्हणकाली देवीच्या आरतीसाठी ही दुर्घटना घडली. एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

VIDEO:माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2019 08:22 PM IST

ताज्या बातम्या