Home /News /mumbai /

BREAKING : मुंबई लोकलबद्दल अखेर निर्णय झाला, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा

BREAKING : मुंबई लोकलबद्दल अखेर निर्णय झाला, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना प्रवासाची मुभा

मुंबईची लाईफ लाईन समजणारी जाणारी लोकल सेवाही याला अपवाद ठरली नाही.

मुंबईची लाईफ लाईन समजणारी जाणारी लोकल सेवाही याला अपवाद ठरली नाही.

लोकल सेवा बंद असल्याने कामानिमित्त मुंबईच्या विविध भागात येणाऱ्या प्रवाशांचे मोठा हाल होत आहेत. त्यामुळे किमान महिलांसाठी तरी लोकल सुरू करा अशी मागणी करण्यात येत होती.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक प्रक्रियेअंतर्गत महिला प्रवाशांसाठी मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा असेल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. 'मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान व सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती, त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत,' अशी माहिती ट्विटरवरून पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला प्रवाशांकडून वाढला होता दबाब लोकल सेवा बंद असल्याने कामानिमित्त मुंबईच्या विविध भागात येणाऱ्या प्रवाशांचे मोठा हाल होत आहेत. त्यामुळे किमान महिलांसाठी तरी लोकल सुरू करा अशी मागणी करण्यात येत होती. तेजस्विनी महिला प्रवासी संघटनेच्या वतीने याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिण्यात आलं होतं. त्या पत्रात खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कामाचे टाइमिंग बदलून त्यांच्यासाठी 11 ते 3 आणि 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत असे वेळापत्रक सुचवले होते.
    First published:

    Tags: Mumbai local

    पुढील बातम्या