मुंबई 27 ऑगस्ट: JEE आणि NEETच्या परीक्षा नियोजित तारखांनाच होणार हे आता स्पष्ट झालं आहे. मात्र अजुनही अनेक राज्य सरकारांनी या परीक्षा घेऊ नयेत अशीच भूमिका घेतली आहे. मात्र परीक्षेला आता अवघे काही दिवस राहिलेले असतांनाच विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. परीक्षा केंद्रांवर पोहोचायचं कसं असा त्यांच्या समोर प्रश्न आहे. अजुनही सर्वाजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत झालेली नाही. त्यामुळे आता रेल्वेने मुंबईत या विद्यार्थ्यांनाही लोकलमधून प्रवासासाठी मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षा घेण्याचा निर्णय झालाच तर मुंबईत अशा विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनाच लोकलने प्रवासाची मुभा आहे. त्यात आता या विद्यार्थ्यांचाही समावेश केला जाणार आहे.
परवानगी मिळताच सर्व सुरक्षा नियमांचं पालन करत रेल्वे चालविली जाईल असंही रेल्वेने सांगितलं आहे. त्याचबरोबर होणारी गर्दी लक्षात घेता हार्बर मार्गावर दोन नव्या गाड्याही सोडल्या जाणार आहेत.
24 तासांत सापडले 75 हजारहून अधिक रुग्ण, मृतांची संख्या 60 हजार पार
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही परीक्षा होणार की नाही यावर अजुनही चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतांनाच जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या ठरलेल्या तारखांनाच होणार असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने National Testing Agency (NTA) दिला आहे. त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता मावळली आहे असं बोललं जात आहे. या खुलाश्यामुळे आता या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत.
करोनाच्या संकटामुळं या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी होत होती. मात्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) 2020 ची जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या पूर्वीच्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे आता JEE ची परीक्षा ही 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान तर NEETची परीक्षा ही 13 सप्टेंबरला होणार आहे.
फुफ्फुसंच नाही तर कोरोना 'या' अवयवांवरही करतो परिणाम, AIIMS च्या तज्ज्ञांचा दावा
परीक्षा घेऊ नये म्हणून देशभरातून मागणी होत होती. शेवटी हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. कोरोनाचं संकट असतं तरी जीवन थांबू शकत नाही असं म्हणत कोर्टाने परीक्षा थांबवायला नकार दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.