News18 Lokmat

कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ट्रॅक दुरुस्त, लोकल 10-15 मिनिटं उशिराने

कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रूळाला गेलेले तडे आता दुरुस्त करण्यात आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 27, 2018 07:26 AM IST

कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ट्रॅक दुरुस्त, लोकल 10-15 मिनिटं उशिराने

प्रदिप भनगे, प्रतिनिधी

मुंबई, 27 नोव्हेंबर : कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रूळाला तडे गेले होते, पण ते आता दुरुस्त करण्यात आला आहे. पण मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल या 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. रेल्वेच्या या वेळेपत्रकानुसार तुम्ही कामाला निघाला असाल तर वेळेआधीच निघा. जेणेकरून तुम्ही प्रवासात अडकणार नाही.

बदलापूर, कर्जत, खोपोलीकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती पण ती देखील आता सुरळीत झाली आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवर त्याचा परिणाम झाला आहे.

रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे सकाळच्या वेळी वेळवर कामवर पोहणाऱ्यां मुंबईकरांना आता मनस्ताप सहन करावा लागला.


Loading...

...आणि अमित शहा रथातून घसरले, व्हिडिओ झाला VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 06:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...