मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आरपीएफ जवानानं वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या रेल्वेच चढताना तोल ढासळला अन्...

आरपीएफ जवानानं वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या रेल्वेच चढताना तोल ढासळला अन्...

Railway police saved life traveller - रेल्वेच्या वेगाचा अंदाज आला नाही, त्यामुळं त्याचं संतुलन बिघडलं. संतुलन बिघडल्यामुळं हा व्यक्ती रेल्वेखाली येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Railway police saved life traveller - रेल्वेच्या वेगाचा अंदाज आला नाही, त्यामुळं त्याचं संतुलन बिघडलं. संतुलन बिघडल्यामुळं हा व्यक्ती रेल्वेखाली येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Railway police saved life traveller - रेल्वेच्या वेगाचा अंदाज आला नाही, त्यामुळं त्याचं संतुलन बिघडलं. संतुलन बिघडल्यामुळं हा व्यक्ती रेल्वेखाली येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मुंबई, 07 जून : कुर्ला रेल्वे स्थानकावर (Kurla Railway Station) आज पुन्हा एकदा रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) एका जवानानं एका प्रवाशाचा जीव वाचवला (Saved life of traveller) आहे. रेल्वे पकडताना संतुलन बिघडल्यामुळं या व्यक्तीचा अपघात होणार होता. पण रेल्वे पोलिसांच्या जवानानं लगेचच या व्यक्तीला बाजुला ओढत त्याचा जीव वाचवला. त्यामुळं या पोलिस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे.

(वाचा-Pune Fire : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, चौकशीचेही आदेश - अजित पवार)

सोमवारी 7 जून रोजी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर हा अपघात घडणार होता. सकाळी 1 च्या सुमारास फलाट क्रमांक 3 वरून 01055 DN (LTT-Gorkhpur)एक्सप्रेस रवाना झाली होती. त्यावेळी एका प्रवाशानं रेल्वे सुरू झाल्यानंतर रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वेच्या वेगाचा अंदाज आला नाही, त्यामुळं त्याचं संतुलन बिघडलं. संतुलन बिघडल्यामुळं हा व्यक्ती रेल्वेखाली येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्याचवेळी फलाटावर असलेले आरपीएफचे जवान मिलिंद पठारे यांनी त्याचा जीव वाचवला.

प्रवाशाचा तोल सुटल्याचं लक्षात येताच मिलिंद पठारे यांनी अत्यंत सतर्कतेनं या प्रवाशाला फलाटावर ओढलं आणि मोठ्या अपघातातून वाचवलं. त्यानंतर लगेचच ऑन ड्युटी गार्डनं प्रेशर ड्रॉप करत रेल्वे थांबवली. त्यानंतर या प्रवाशाला सुरक्षितपणे रेल्वेमध्ये बसून रवाना करण्यात आलं. या प्रवाशानं रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.

(वाचा-मित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात)

रेल्वे पोलिस सातत्यानं अशा प्रकारे प्रवाशांचा जीव वाचवत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र प्रवाशांनीही स्वतःच्या जीवाचा विचार करणं गरजेचं आहे. धावत्या रेल्वेमध्ये चढू नये, असं वारंवार सांगितलं जात असतानाही अनेक प्रवासी तसं करतात. अशावेळी त्यांचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना त्यांचा जीव धोक्यात घालावा लागतो.

First published:

Tags: Mumbai, Railway accident