मुंबई, 01 जून : मुंबईत तीन दिवसांपूर्वी चोराबरोबरच्या झटापटीत रेल्वेच्या महिला डब्यातून पडल्यामुळं महिलेचा (Woman died while fighting with thief) मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा महिला डब्यात पोलिसांची उपस्थिती नव्हती. मात्र यावर स्पष्टीकरण देताना रेल्वे पोलिसांनी (Railway Police) अजब वक्तव्य केलं आहे. महिला प्रवासी डब्यांमध्ये रात्री 9 नंतरच पोलिस असतात. तसंच मनुष्यबळ कमी असताता सगळीकडं कसं लक्ष देणार असं अजब वक्तव्य पोलिसांनी केलं आहे.
(वाचा-Corona Update रुग्णसंख्येत घट सुरू मात्र मृतांच्या आकड्यात समाधानकारक घट नाहीच)
कळवा रेल्वे स्थानकावर २९ मे म्हणजे शनिवारी रात्री एका मोबाईल चोरट्यानं महिला प्रवासी डब्यात चढून विद्या पाटील या महिलेचा मोबाईल चोरला. त्यावेळी चोराबरोबर झटापट करताना विद्या चव्हाण यांचा तोल गेला आणि त्या रेल्वेखाली पडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जर महिला डब्यामध्ये पोलिसांची उपस्थिती असती तर ही घटना टळू शकली असती. पण डब्यात कोणीही उपस्थित नव्हते. खरं तर सायंकाळी महिलांच्या डब्यात जवान असणे बंधनकारक आहे. पण तरीही याठिकाणी पोलिस नव्हते.
(वाचा-ठाकरे सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर)
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. संध्याकाळी ६ नंतर महिलांच्या डब्यात GRP/RPF जवान असणं बंधनकारक असतांना ते का उपस्थित नव्हते? याची चौकशी होणे गरजेच आहे. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
संध्याकाळी ६ नंतर महिलांच्या डब्यात GRP/RPF जवान असणे बंधनकारक असतांना ते का उपस्थित नव्हते? याची चौकशी होणे गरजेचे यासंदर्भात उद्या @drmmumbaicr यांची त्यांच्या कार्यालयात संध्याकाळी ५ वाजता भेट घेणार आहे@Central_Railway @BJP4Maharashtra @PiyushGoyalOffc pic.twitter.com/hWLIexmvFd
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 1, 2021
दरम्यान, याबाबत रेल्वे पोलिसांना विचारणा केली असता त्यांच्याकडून अजब अशी उत्तरं मिळाली आहेत. महिला प्रवासी डब्यांमध्ये रात्री 9 नंतरच पोलिस असतात. तसंच ज्यावेळेस ही घटना घडली ती वेळं शिफ्ट बदलीची असते. त्याशिवा कमी मनुष्यबळ असल्यानं रेल्वे फलाटावर पोलिस कमी असतात असं अजब वक्तव्य ठाणे लोहमार्ग पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक एन.जी.खडकीकर यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News, Railway accident, Thief