MEGABLOCK : सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या कसं आहे लोकलचं वेळापत्रक

रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 01:50 PM IST

MEGABLOCK : सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या कसं आहे लोकलचं वेळापत्रक

मुंबई, 12 ऑक्टोबर: रविवारी म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असल्यानं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं. रविवारी मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगादरम्यान सकाळी 10.30  ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.

दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 9.53 पासून दुपारी 2.42 वाजेपर्यंत जलद मार्गावरील लोकल ह्या धीम्या मार्गे वळवण्यात येणार आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या जलद लोकलही सर्व मार्गांवर थांबतील

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरुन धावणार आहेत. तर विलेपार्ले स्थानकाची लांबी कमी असल्यानं दोन वेळा लोकल थांबणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर राममंदिर स्थानकात जलद मार्गासाठी फलाट उपलब्ध नसल्यानं लोकल थांबणार नाही त्यामुळे उद्या तिथल्या अथवा राम मंदिर स्थानकावर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे तिथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हार्बर मार्गावर विशेष मेगा ब्लॉक

वडाळा रोड ते वाशी अप-डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 असा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 सीएसएमटीहून वाशी, पनवेल, बेलापूरच्या दिशेनं एकही लोकल धावणार नाही. वाशी ते पनवेल अशा जादाच्या लोतक प्रवाशांसाठी या काळात सोडण्यात येणार आहेत. मेगा ब्लॉकच्या काळात ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करण्याची परवानगी प्रवाशांना असेल.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...