Home /News /mumbai /

महिलांच्या लोकल प्रवासाला रेल्वेचा ‘रेड सिग्नल’, सरकारपुढे वाचला अडचणींचा पाढा

महिलांच्या लोकल प्रवासाला रेल्वेचा ‘रेड सिग्नल’, सरकारपुढे वाचला अडचणींचा पाढा

राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवून लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र रेल्वेने सरकारला अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तर मागितली आहे.

मुंबई 19 ऑक्टोबर: सर्वच महिलांना रेल्वेमध्ये प्रवास करणं सध्यातरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महिलांना प्रवासाची मुभा देण्याची तयारी दाखवत रेल्वेला विनंती केली होती. मात्र रेल्वे विभागाने सरकारसमोर अडचणींचा पाढा वाचला असून अनेक प्रश्नांची उत्तरं मागितली आहे. त्यामुळे महिलांचा रेल्वे प्रवास हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोकरीसाठी ऑफिस आणि कामावर पोहोचण्यासाठी महिलांना सध्या प्रचंड हालअपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे. लोकलमध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचायचं कसं असा प्रश्न त्यांना होता. त्यामुळे प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणीही होत होती. त्यामुळे राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवून लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र रेल्वेने सरकारला अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तर मागितली आहे. काय आहे रेल्वेची भूमिका? रेल्वेने सरकार कडून किती प्रमाणात महिला प्रवासी वाढू शकतील ही आकडेवारी मागीतली आहे. इतकच नाही तर पश्चिम रेल्वेने महिलांसाठी ट्रेन चालवण्याची कार्यपध्दती ही सरकारकडून अपेक्षित असल्याचं कळवलं आहे. त्यामुळे रेल्वे सरसकट महिलां प्रवाशांना प्रवास करू देण्यासाठी तयार नाही का? असा प्रश्न आता महिला प्रवासी विचारू लागल्या आहेत. किती महिला प्रवासी प्रवास करू शकतील असा प्रश्न रेल्वेने विचारला याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा सगळा डेटा रेल्वेकडेच असताना त्यांनी माहिती का विचारली याबाबतही नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर 700 तर मध्य रेल्वे वर 706 ट्रेन सुरू आहेत. सध्या उत्सवांचे दिवस असल्याने महिलांना प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी होत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या