S M L

रुळाला तडे गेल्यानं हार्बर रेल्वे विस्कळीत

Samruddha Bhambure | Updated On: Apr 24, 2017 10:01 AM IST

रुळाला तडे गेल्यानं हार्बर रेल्वे विस्कळीत

24 एप्रिल :   हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

मानखुर्द आणि वाशी स्टेशनच्या दरम्यान वाशी खाडी पुलावरील रुळाला तडे गेलेत. त्यामुळे गेल्या तासाभरापासून सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प आहे.

रेल्वे प्रशासनानं तातडीनं रुळांच्या दुरस्तीचं काम हाती घेतलं आहे. मात्र, वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 09:51 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close