Home /News /mumbai /

वसई रोड स्टेशनवर चालत्या मेल-एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न भोवला; घटनेचा LIVE VIDEO

वसई रोड स्टेशनवर चालत्या मेल-एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न भोवला; घटनेचा LIVE VIDEO

रेल्वे स्टेशनवर चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच जीवावर बेतणारं ठरलं आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती चालत्या मेल-एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता.

  मुंबई, 25 जानेवारी : रेल्वे स्टेशनवर (Railway Station) चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच जीवावर बेतणारं ठरलं आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्टेशनवर (Vasai Road Station) एक व्यक्ती चालत्या मेल-एक्सप्रेसमध्ये (Running Express) चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल गेल्याने प्रवाशी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पडला. त्याचवेळी रेल्वे स्टेशनवर असलेल्या आरपीएफ जवानांनी (RPF Jawan) त्याला बाहेर ओढलं आणि रेल्वेखाली जाता-जाता तो व्यक्ती थोडक्यात बचावला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Footage) कैद झाला आहे.

  हे वाचा - भूतबाधा झाल्याचं सांगून लावला 32 लाखांचा चुना, डोंबिवलीतील महिलेसोबत घडलं विपरीत

  वसई जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी जवळपास 4.45 वाजता घडली. एक प्रवासी पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 3 वर बांसवाडा राजस्थानला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये चढत होता. वसई रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना प्रवाशाचा तोल सुटला आणि तो चालत्या ट्रेनमधून खाली पडला. ट्रेनमधून खाली पडल्यानंतर कितीतरी लांबपर्यंत व्यक्ती ट्रेनसोबत फरफटत गेला. खाली पडल्यावर तो रेल्वे खाली अडकणार होता. परंतु ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल रामेंद्र कुमार यांनी हे पाहिलं आणि ते तातडीने व्यक्तीजवळ पोहोचले. प्लॅटफॉर्मवर उपस्थित प्रवाशांच्या मदतीने त्यांनी व्यक्तीला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधून बाहेर ओढलं आणि त्याचा जीव थोडक्यात बचावला.

  Alert..! हवेचा दर्जा धोकादायक, मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली

  वेजा हरदु मैदा असं त्या व्यक्तीचं नाव असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. आरपीएफकडून उपचारानंतर व्यक्तीला घरी सोडण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरपीएफच्या या जवानांचं या कौतुकास्पद कामासाठी कौतुक होत आहे.
  अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. भारतीय रेल्वेकडूनही अनेकदा चालती ट्रेन न पकडण्याचं आवाहन केलं केलं जातं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Accident, Indian railway

  पुढील बातम्या