रेल्वे रोको आंदोलक ८०० ते १००० विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल, 2 जणांना अटक

रेल्वे रोको आंदोलक ८०० ते १००० विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल, 2 जणांना अटक

रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी माटुग्यांत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेनं आज सकाळी दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.

  • Share this:

20 मार्च : रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आज दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केला होता. या प्रकरणी आता आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २ जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच ८०० ते १००० विद्यार्थ्यांच्या जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी माटुग्यांत रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थी संघटनेनं आज सकाळी दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल साडे 3 तास मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत होती.

अॅप्रेंटिस उमेदवारांची वेगळी परीक्षा घेण्यात येणार असून या परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे असा निर्णय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने घेतलाय. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. मात्र आंदोलनादरम्यान रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचाही प्रयत्न केला.

मात्र, विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्राच स्वीकारला होता पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यानं विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली.त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत याबद्दल माहिती दिली होती. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी आता ८०० ते १००० विद्यार्थ्यांच्या जमावावर गुन्हे दाखल केले आहे. तसंच दोन जणांना अटक केली आहे.

First Published: Mar 20, 2018 06:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading