'तो' जखमेनं विव्हळत होता, रेल्वे पोलीस त्याला लोकलमध्ये ढकलत होते

'तो' जखमेनं विव्हळत होता, रेल्वे पोलीस त्याला लोकलमध्ये ढकलत होते

जखमी प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता.

  • Share this:

23 आॅगस्ट : रेल्वे रुळ ओलांडू नका, धावत्या लोकलमध्ये चढू नका अशा सुचना रेल्वे विभागाकडून वारंवार दिल्या जातात. पण एका जखमी प्रवाशाची मदत न करता त्याला मृत्यूच्या दारात लोटण्याचं काम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलंय.

नवी मुंबईत 22 जुलैला एका चालत्या ट्रेनमधून एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला होता, त्याला उपचारासाठी दाखल करण्याऐवजी तिथं उपस्थित असलेल्या जीआरपी आणि होमगार्डच्या कर्मचारी बघत बसले. धक्कादायक म्हणजे या कर्मचाऱ्यांनी नंतर आलेल्या चालत्या ट्रेनमध्ये त्यांनी जखमी प्रवाशाला टाकण्याचा प्रयत्न केला.

पण ते त्यांना जमलं नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय.  त्या जखमी प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता.

दरम्यान, तिथं उपस्थित असलेल्या कॉन्सेटबलला निलंबित करण्यात आलंय आणि होमगार्डलाही हटवण्यात आलंय.

First Published: Aug 23, 2017 06:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading