S M L

मुंबई कुणाची? राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण?

दक्षिण मध्य मुंबईमध्ये धारावी आणि दादर, माहीम यासारखे भाग येतात. इथे यावेळी राहुल शेवाळेंसमोर एकनाथ गायकवाड यांनी चांगलं आव्हान उभं केलं आहे.

Updated On: Apr 25, 2019 07:12 PM IST

मुंबई कुणाची? राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण?

विवेक कुलकर्णी

मुंबई, 25 एप्रिल :

लोकसभेच्या रणसंग्रामात दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.


श्रीमंत आणि गरीब

दक्षिण मध्य मुंबई म्हणजे दादर, माहीम यासारखा शहरी मध्यमवर्गियांचा भाग आणि धारावीमधली कष्टकरी गरीब लोक असा हा संमिश्र स्वरूपाचा राखीव मतदारसंघ. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा हा मतदारसंघ 'मातोश्री'च्या जवळचा. पण इथे समाधानकारक कामं झाली नाहीत. त्यामुळे राहुल शेवाळेंविरुद्ध मतदारांमध्ये नाराजी आहे.

धारावीचा पुनर्विकास

Loading...

धारावीचा पुनर्विकास, माहूलचं प्रदूषण असे मुद्दे इथे गाजत आहेत. त्यातच नोटबंदीमुळे धारावीतल्या छोट्या उद्योगांना बसलेला फटका, बेरोजगारी हे मुद्दे युतीच्या विरोधात जाऊ शकतात. पण त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा म्हणावा तसा जनसंपर्क नाही. त्यामुळे धारावी वगळता बाकीच्या भागात त्यांनी किती प्रतिसाद मिळेल हे पाहावं लागेल. पण राहुल शेवाळे यांना मात्र त्यांनी चांगलंच आव्हान निर्माण केलं आहे.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

====================================================================================

VIDEO : साध्वींचं पुन्हा स्फोटक विधान, दिग्विजय सिंहांना म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 07:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close