Home /News /mumbai /

सासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी

सासरच्या मंडळीला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीकडे करू, जयंत पाटलांची नार्वेकरांना कोपरखळी

'खरंतर कुणालाच या जागेसाठी आपली निवड होऊ नये असे वाटते कारण प्रत्येकाला मंत्री व्हायचे असते

    मुंबई, 03 जुलै : राहुल नार्वेकरजी तुम्ही आमचे जावई आहात. त्यामुळे तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आमच्या मुलीला सांगू आणि मग तुमचा समाचार घेतला जाईल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी खुमासदार टोला लगावला. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलत असताना  जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलं. 'आता कुणी सभागृहाच्या नियंमांचे पालन करत नाही. सदस्य बोलत असले की तिकडे लोक मध्येच बोलतात. अध्यक्ष बोलत असले की लोक मध्येच सभागृहात येतात जातात, असं म्हणत जयंत पाटलांनी  भास्कर जाधवांना चिमटा काढला. 'मघाशी अबु आझमी बोलत होते. तेव्हा त्यांचे म्हणणे पूर्ण होऊ द्यायला हवे प्रत्येक वेळी आक्षेप घेतलेच जावे हे योग्य नाही. खाली जावई आणि वरचा सभागृहात सासरे अशी व्यवस्था फडणवीसजी तुम्ही किमान वर्षभरासाठी करावी.राहुलजी तुम्ही आमचे जावई आहात. त्यामुळे तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आमच्या मुलीला सांगू आणि मग तुमचा समाचार घेतला जाईल' असा इशाराच जयंत पाटलांनी दिला आणि सभागृहात एकच हश्शा पिकली. 'खरंतर कुणालाच या जागेसाठी आपली निवड होऊ नये असे वाटते कारण प्रत्येकाला मंत्री व्हायचे असते. तुम्हाला नगरविकास खाते मिळेल असे मला वाटले होते. आपण मंत्री व्हावं. आमचा जावई मंत्री व्हावा, वकिलांचा वापर हा  बाहेर करायचा असतो. अध्यक्षपदावर करायचा नसतो. आपण सर्वांना न्याय द्यालं असा मला विश्वास आहे, असंही पाटील म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या