या मोठ्या कारणामुळे राहुल गांधी अमित ठाकरेच्या लग्नाला येणार नाहीत

या मोठ्या कारणामुळे राहुल गांधी अमित ठाकरेच्या लग्नाला येणार नाहीत

26 जानेवारीला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेचं लग्न आहे. या शाही लग्न सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 26 जानेवारी : 26 जानेवारीला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेचं लग्न आहे. या शाही लग्न सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. पण ते या लग्नासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या अमितच्या लग्नाला न येण्याच्या बातमीमुळे महाआघाडीच्या आणि वेडींग डिप्लोमसीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असंच म्हणावं लागेल. पण राहुल गांधी मुंबईत राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाला यावे अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा होती.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या येण्यामुळे कुठेतरी मत विभाजनाची भिती असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. पण त्यावर आता पूर्णविराम लागला आहे.

तर राज्यात काँग्रेसच्या मतांवर कोणताही परिणाम होऊ नये, त्याचबरोबर त्यांच्या येण्याने कोणताही चुकीचा राजकीय संदेश पसरू नये यासाठी राहुल गांधी यांनी लग्नाला येण्याचं टाळलं असल्याचं बोललं जात आहे.

तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लग्नाचं आमंत्रण न देता फक्त राहुल गांधी यांना लग्नाचं आमंत्रण दिल्यामुळे राज ठाकरे आघाडीचा विचार करत असल्याचं दिसलं.

हेही वाचा : अमित ठाकरेच्या लग्नासाठी ही आहे हायप्रोफाईल पाहुण्यांची लिस्ट

दरम्यान, या लग्नासाठी अनेक हायप्रोफाईल मंडळी उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांनी लग्नाची प्रत्रिका सप्तशृंगी देवीला विधिवत अर्पण केली आहे. या पत्रिकेत फक्त ५ लोकांची नावे आहेत.

राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे.

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता.

मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. देवाच्या चरणी पत्रिका ठेवून देवाला आमंत्रण दिल्यानंतर लग्नपत्रिका वाटण्याची परंपरा आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी नाशकात सप्तश्रृंगी देवीच्या चरणी पत्रिका ठेवली.

रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अगदी कमी पाहुण्याना बोलवून विवाह सोहळा पार पडणार आहे.  यात राजकीय नेते , मराठी आणि हिंदी कलाकार, व्यावसायिक, पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार यांसंह इतर राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा परिवार सकाळपासूनच उपस्थित राहणार आहेत. अंबानी परिवार, रतन टाटा उपस्थित राहणार आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, बॉलिवुड कलाकार शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जावेद अखतर, सोहिल खान, गायक लता मंगेशकर उपस्थित राहणार आहेत.

आज संध्याकाळी घरगुती पद्धतीने हळदीचा कार्यक्रम पडला. यासाठी निवडक लोकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. उद्या सकाळी मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी रिशेप्शन असणार आहे. सर्व विधी या मराठामोठ्या पद्धतीने होणार आहेत.

VIDEO : 'हम चलते है ऐसे तो दिल दुश्मन के हिलते है...' जवानांनी गायलं गाणं

First published: January 26, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading