कमला मिल अग्नितांडव- राहूल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली

कमला मिल अग्नितांडव- राहूल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली

मुंबईच्या या घटनेला गांधी यांनी अत्यंत दुर्दैवी घटना म्हटलं आहे. तसंच पीडितांच्या दु:खांमध्ये आपण सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. आता मराठीतून श्रद्धांजली देण्यामागे नक्की हेतू काय होता हे कळू शकलेलं नाही.

  • Share this:

 मुंबई, 29 डिसेंबर: मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे तब्बल 14 लोकांना जीव गमवावा लागला आहे. या मृतांना सर्वच स्तरातील राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली दिली आहे. पण काँग्रेस अध्यक्ष  राहूल गांधी यांनी मात्र मराठीतून ट्विट  करून  श्रद्धांजली दिली आहे.

मुंबईच्या या घटनेला गांधी यांनी अत्यंत दुर्दैवी घटना  म्हटलं आहे. तसंच पीडितांच्या दु:खांमध्ये आपण सहभागी असल्याची  भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.  आता मराठीतून श्रद्धांजली देण्यामागे नक्की हेतू काय होता हे कळू शकलेलं नाही. पण 2019च्या दृष्टीने जास्तीजास्त लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत.

कमला मिलच्या आगीत गुदमरून 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोसमध्ये ही आग लागली आहे. बघता बघता आग वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला आहे. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळच असलेल्या हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले व हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे.

मुंबई मधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.#KamalaMills

— Office of RG (@OfficeOfRG) December 29, 2017

First published: December 29, 2017, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading