राहुल गांधींनीच अध्यक्षपद स्वीकारावं, थोरातांनंतर राज्यातील काँग्रेसच्या आणखी एका नेत्यानं लिहिलं पत्र

राहुल गांधींनीच अध्यक्षपद स्वीकारावं, थोरातांनंतर राज्यातील काँग्रेसच्या आणखी एका नेत्यानं लिहिलं पत्र

राज्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते पत्र लिहित राहुल गांधी यांनीच ही जबाबदारी उचलावी, अशी मागणी करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या आपल्या पदावरून पायउतार होण्याच्या मानसिकतेत असल्यामुळे काँग्रेसला नव्या अध्यक्षांचे वेध लागले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत आली आहेत. तसंच विविध राज्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते पत्र लिहित राहुल गांधी यांनीच ही जबाबदारी उचलावी, अशी मागणी करत आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी करणारं पत्र लिहिल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही निवेदन सादर केलं आहे.

'पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, खा. राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. खा. राहुलजी गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, ही आमची मागणी आहे,' असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

अशोक चव्हाण यांचं निवेदन :

भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे.

पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, खा. राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. खा. राहुलजी गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, ही आमची मागणी आहे.

खा. सोनियाजी गांधी यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-1 आणि युपीए-2 च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे."

Published by: Akshay Shitole
First published: August 23, 2020, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading