S M L

राहुल गांधींची २ मिनिट ४७ सेकंदाची पत्रकार परिषद ठरली ऐतिहासिक !

कारण राहुल यांची पत्रकार परिषद केवळ 2 मिनिटं 47 सेकंद चालली.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 13, 2018 01:54 PM IST

राहुल गांधींची २ मिनिट ४७ सेकंदाची पत्रकार परिषद ठरली ऐतिहासिक !

मुंबई, 13 जून : मुंबईत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद अवघ्या पावणेतीन मिनिटात संपली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील संवाद समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.

काल मुंबई काँग्रेसतर्फे राहुल यांना तुम्ही प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया द्या अशी विनंती करण्यात आली, त्याला राहुल यांनी मान्यताही देण्यात आली. पण पत्रकारांना मात्र पत्रकार परिषद आहे असा निरोप देण्यात आला. तशी कल्पना राहुल यांना रात्री देण्यात आली नाही.

आज सकाळी ईलेकट्राॅनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने बीकेसीतील एमसीए इथं जमा झाले. असं झाल्यानंतरही आज फक्त प्रतिक्रिया घेण्यासाठी नाही तर पत्रकार परिषदेसाठी सगळे पत्रकार आले आहेत याची कल्पना मुंबई काॅंग्रेसनं राहुल यांना दिली नाही.

८:३० वाजताची पत्रकार परिषद बराच वेळ झाल्या नंतरही सुरु झाली नाही. पत्रकार परिषदेसाठी असणारे टेबल काढण्यात आले आणि त्या जागी पोडीयम ठेवण्यात आलं. तेव्हाच राहुल मोजके प्रश्न घेतली हे लक्षात आलं होतं.

राहुल गांधी ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल ५० मिनिटं उशीरा आले, अवघा १ प्रश्न घेतला आणि २ मिनिट ४७ सेकंदात आपली पत्रकार परिषद संपवली. या सगळ्या प्रकाराने काॅंग्रेसमधील संवाद समन्वयाचा अभाव प्रकर्षानं पुढे आला. या सगळ्या प्रकारानंतर #HistoricPC हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 10:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close