मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /माझं नाव सावरकर नाही ते पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

माझं नाव सावरकर नाही ते पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

दिल्ली, 25 मार्च : राहुल गांधी यांना सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. त्यानंतर संसदीय समितीकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झालं आहे. राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. खासदारकी रद्द करून तुम्ही मला गप्प बसू शकत नाहीत असा इशारा राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमधून सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले राहुल गांधी

 राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमधील पाच महत्त्वाचे मुद्दे

देशात लोकशाहीवर अतिक्रमण होत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. खासदारकी रद्द करून मला तुम्ही गप्प बसवू शकत नाही असा इशाराही या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माझं नाव सावरकर नाही त्यामुळे मी कधीच माफी मागणार नसल्याचं त्यांनी म्हटलं  आहे.

मला कोणी घाबरू शकत नाही, संसदेत माझ्याविरोधात सातत्यानं खोटं बोललं गेलं. तुरुंगात टाकण्याचा धमक्या देऊन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय ,असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

खासदारकी रद्द झाली आहे, आता आपली पुढची भूमिका काय असेल? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, पुर्वी विरोधी पक्षांना देखील प्रसार माध्यमं आणि इतर संस्था सहकार्य करत होत्या. मात्र आता तसं होत नाही, त्यामुळे विरोधी पक्षांना लोकांशी थेट संवाद साधावा लागणार आहे. आम्ही भारतजोडो यात्रेच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला.

भाजपकडून सातत्यानं राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान झाला असा आरोप करण्यात येत आहे. याला देखील राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे. मी जेव्हा भारत जोडो यात्रेत सहभागी झालो तेव्हाच सांगितलं होतं सर्व समाज एक आहे. मग ओबीसीचा अपमान मी कसा करू शकतो? देशातील महत्त्वाच्या मुद्दयावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून असा प्रचार सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये अस्वस्थता आहे. तेथील जनतेला काय संदेश देणार असं प्रश्न राहुल गांधी यांना विचारला असता राहुल गांधी म्हणाले की तेथील लोकांशी माझं एक भावनिक नात निर्माण झालं आहे. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील लोकांना चिठ्ठी लिहून माझ्या भावना व्यक्त करणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Congress, Rahul gandhi