काँग्रेस-शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, राहुल गांधींचा आदित्य ठाकरेंना फोन

काँग्रेस-शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, राहुल गांधींचा आदित्य ठाकरेंना फोन

यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली आणि काही सूचनाही केल्या.

  • Share this:

मुंबई, 28 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोनवर संवाद साधला.

महाविकास आघाडीची एकजुट कायम आहे यासाठी आता राहुल गांधी यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.   यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली आणि काही सूचनाही केल्या.

 

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांसाठी करण्यात येत असलेल्या विशेष उपाय योजनांवर ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्ता सहभागाबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर महाविकास आघाडीतील एकजुटीवर प्रश्नं चिन्हं निर्माण झाले होते. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चेतून मार्ग सोडवला जात आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या भूमिकेबद्दल परखड मत व्यक्त केलं होतं.  'महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आहे, मात्र आम्हाला मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी  केलं होतं.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी 27 मे रोजी राहुल गांधी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. या चर्चेत राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा झाली. तसंच, राज्यातील राजकीय घडामोडींवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

संपादन - सचिन साळवे

First published: May 28, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या