नरेंद्र की राह पर देवेंद्र...!!! मुख्यमंत्र्यांचं 'मोदी स्टाईल' राजकारण

नरेंद्र की राह पर देवेंद्र...!!! मुख्यमंत्र्यांचं 'मोदी स्टाईल' राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात 'मोदी स्टाईल' वापरली आहे, मोदींच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपल्या मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

रफिक मुल्ला, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 12 सप्टेंबर : मंत्रीमंडळामध्ये सर्व आलबेल नाही आणि मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार याचा पुरावा म्हणून या बातमीकडे पाहता येईल, सूत्रांच्या माहितीनुसार मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांकडून कामगिरीचा आढावा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार खासदारांना चांगलेच झापले आहे. अलीकडच्या काही घटनांचा आणि काही मंत्र्यांच्या मनमानी कारभारामुळे मुखमंत्र्यांनी हाती आसूड घेतला आहे..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यात 'मोदी स्टाईल' वापरली आहे, मोदींच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपल्या मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिले आहेत की त्यांनी स्वतःच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर करावा, मंत्रिपदी राहून काय काम केले, किती कल्पक आणि नवीन निर्णय घेतले तसेच ते निर्णय किती लोकपयोगी ठरले, याचा आढावा संपूर्ण आकडेवारीसह देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत- ही सर्व माहिती सर्व मंत्र्यांनी विहित मुदतीत द्यायची आहे तसेच भाईंदरच्या रामभाऊ म्हाळगी सभागृहात भाजपची एक गुप्त बैठक झाल्याची समजतेय.. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 39 आमदार आणि 11 खासदारांना खूप झापलेय.. तुमची वर्तणूक चांगली नाही. वेळेत तुम्ही सुधारलात नाहीत.. तर येत्या निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही.. तुमच्या येथील लोकांनीच तुम्हाला उमेदवारी देऊ नये असं सर्व्हे मध्ये आलंय.. दिल्ली प्रमाणे तुमच्या घरातील कोणालाही नगरसेवक पदाची उमेदवारी दिली जाणार नाही.. असा दमच मुख्यमंत्रांनी त्या सभेत दिलाय..यामुळे 39 आमदार आणि 9 खासदार चिंतेत आहेत..

एक आमदार फेरीवाल्यांना मारतो तर दुसरा कायदा हातात घेतो, तिसरा आमदार कंत्राटदारांला टक्केवारी मागताना समोर येतो तर नाना पटोलेंसारखा खासदार थेट मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर जाहीरपणे टीका करतो, हे कमी की काय म्हणून काही मंत्री मुख्यमंत्र्यांविरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, यासर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणूनच अशा काडीखोर मंत्र्यांना संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात वगळायचे असेल तर त्यासाठी हाती काहितरी आधार हवा, त्यांचं रिपोर्टकार्ड हाती असावं म्हणूनच केंद्रात मंत्रीमंडळ विस्ताराआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच पद्धतीने आढावा घेतला होता..नेमक्या त्याच 'मोदी स्टाईल'ने मुख्यमंत्री पुढे चालले आहेत. पाहुयात या पक्षांतर्गंत कुरघोडीत मुख्यमंत्री जिंकतात की त्यांचे प्रतिस्पर्धी ?

First published: September 12, 2017, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading