'ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटीलांनी सुजयला भाजपमध्ये पाठवलं का?'

'ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटीलांनी सुजयला भाजपमध्ये पाठवलं का?'

'राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावरील आणि त्यांच्या परिवारावरील ईडीची कारवाई थांबवण्यासाठी सुजय यांना भाजपमध्ये पाठवलं का? अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 08 मार्च : ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजयला भाजपात पाठवला का? असा टोला शिवसेना प्रवक्ता डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

'राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावरील आणि त्यांच्या परिवारावरील ईडीची कारवाई थांबवण्यासाठी सुजय यांना भाजपमध्ये पाठवलं का? अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'सध्या सुजय भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करत आहेत अशी बातमी आली म्हणून विचारलं' असाही टोला शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला.

'तसंही राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच कार्यरत होते. हे आपण गेले काही वर्ष अनुभवलं आहेच. भाजप शासनाची विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपत तर एक कॉंग्रेसमध्ये अशी अवस्था असण्यामागेही त्यांना आपल्यावर ईडीची करवाई होणार तर नाहीना अशी भीती वाटत असावी' असंही त्या उपहासाने म्हणाल्या.

सुजय विखे-पाटील भाजपच्या वाटेवर? मुंबईत राजकीय हालचालींना वेग

गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आहे. भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये आज बैठक झाली आहे. त्यामुळे सुजय यांना भाजपमधून तिकीट मिळणार हे आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये गुप्त बैठका सुरू असल्याच्या चर्चा रंगत असताना 'मी विखेंना भेटलोच नाही' असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीतून सुजय यांना तिकीट मिळणार नाही हे नकळत का होईन पवारांनी स्पष्ट केलं. काँग्रेसमधूनही त्यांना उमेदवारी देणं शक्य नाही. त्यामुळे आता भाजपमधून तिकीट मिळणं हाच एक पर्याय सुजय विखे यांच्यासमोर होता.

पण आता सुजय विखे पाटली यांच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा भाजपमध्ये जाणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. तर सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अशातच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही तुफान चर्चा होती. पण त्यावर पवारांच्या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?

First published: March 8, 2019, 10:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading