2019मध्ये हेच 'उंदीर' तुमचं सिंहासन पोखरतील - राधाकृष्ण विखे पाटील

2019मध्ये हेच 'उंदीर' तुमचं सिंहासन पोखरतील - राधाकृष्ण विखे पाटील

उंदरांची संख्या बघून वाघाची मांजर झालीय. ही मांजर उंदरांना पकडायला जाते पण त्यांना दुधाचं ताट दाखवलं की ती फक्त म्याव म्याव करते, असा सणसणीत टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला हाणला आहे.

  • Share this:

28 मार्च : विधान सभेत परत उंदरांचा मुद्दा आलाच. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उंदरांची संख्या बघून वाघाची मांजर झालीय. ही मांजर उंदरांना पकडायला जाते पण त्यांना दुधाचं ताट दाखवलं की ती फक्त म्याव म्याव करते, असा सणसणीत टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला हाणला आहे. 2019मध्ये हेच उंदीर तुमचं सिंहासन पोखरतील, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले, कृषी विभागाच्या आहेत काही तूरडाळ कुरतडत आहेत. पुण्यातले उंदीर बेरकी, ते पकडायला गेले की ते पुणेरी पगडी खाली लपून बसतात. काही उंदीर कुपोषित मुलांचं धान्य खातायत, काही उंदीर मेक इन महाराष्ट्रची स्वप्न दाखवताय.

सरकारवर टीका करताना ते म्हणाले, सरकारी उंदीर पकडता येतात, पण अनेक खाजगी उंदीर कसे पकडणार?  अनेक उंदीर रस्त्यांच्या खड्यात जाऊन बसले. उंदरांची संख्या बघून वाघाची मांजर झालीय. ही मांजर त्यांना उंदरांना पकडायला जाते पण त्यांना दुधाचं ताट दाखवली की ती फक्त म्याव म्याव करते.

First published: March 28, 2018, 3:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading