S M L

शिवसेनेच्या मेंदूत झोल झोल म्हणून भूमिका गोल गोल -विखे पाटील

" कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका कायम गोंधळाची असून 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडा सरकारनं आणला कुठून ?"

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2017 04:44 PM IST

शिवसेनेच्या मेंदूत झोल झोल म्हणून भूमिका गोल गोल -विखे पाटील

23 जुलै : शेतकरी कर्जमाफीवर बोलण्याचं सोडून एका आरजेविरोधात शिवसेनेचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळेच सेनेच्या मेंदूत झोल झोल झाला आणि भूमिका गोल झालीये अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. तसंच

कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका कायम गोंधळाची असून 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडा सरकारनं आणला कुठून असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केलाय.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर सडकून टीका केली.

सरकार कर्जमाफीच्या लाभार्थींची सांगत असलेली संख्या फसवी असल्याचा आरोप यावेळी विखे पाटलांनी केलाय. सरकार आता शेतकऱ्यांचे फॉर्म भरुन घेणार आणि नंतर कर्जमाफी देणार हे कसं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

सत्तेत आल्यापासून शिवसेनेची भूमिका कायम संशयास्पद राहिलीये. अलीकडे आरजे मलिष्काने केलेल्या गाण्यावर सेनेनं गोंधळ घातलाय. मलिष्काच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे. आता यापेक्षा वैचारिक दिवाळखोरी असूच शकत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मेंदूत झोल झोल आहे आणि भूमिका गोल गोल आहे असं सांगत शिवसेना म्हणजे एफएम रेडिओ झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 04:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close