'राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जिथं जातील तिथं खोड्या, भाजपमध्ये घेऊन तोटाच झाला'

'राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जिथं जातील तिथं खोड्या, भाजपमध्ये घेऊन तोटाच झाला'

भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर थेट आरोप केला आहे.

  • Share this:

नाशिक,14 डिसेंबर: भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर थेट आरोप केला आहे. अहमदनगरमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते जिथं जातात तिथं खोड्या करतात. त्यांना भाजपत घेऊन फायदा तर दूरच उलट तोटाच जास्त झाला, असेही राम शिंदे यांनी टोला लगावला आहे.

भाजपमधील पराभूत झालेल्या 12 उमेदवारांची बैठक शनिवारी नाशिकमध्ये पार पडली. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राम शिंदे यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. राम शिंदे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये झालेल्या 'इनकमिंग'वर नाराजी व्यक्त केली. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. राम शिंदे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाला राधाकृष्ण विखे पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

काय म्हणाले राम शिंदे..

राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपत घेऊन काही फायदा झाला, उलट नुकसान झाले. राधाकृष्ण विखे-पाटील आणि मधुकर पिचड पक्षात आल्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या सातवर गेली होती. परिणामी ही संख्या वाढण्याची अपेक्षा होती मात्र ती कमी झाली. दुसरीकडे, स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले यांनीही विखे-पाटलांवर यावेळी आरोप केला. विखे यांनी त्यांच्या मेहुण्याला कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष उभे केले. मात्र, त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. एकप्रकारे पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्यामुळे पराभव झाल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. तर, शिवाजी कर्डिले यांनीही भाजपला आयात लोकांचा तोटाच झाल्याचे सांगितले.

First Published: Dec 14, 2019 09:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading