Home /News /mumbai /

VIDEO : आंबिवलीच्या इराणी वस्तीत दोन गटांत राडा, भररस्त्यात एकमेकांवर उगारल्या तलवारी

VIDEO : आंबिवलीच्या इराणी वस्तीत दोन गटांत राडा, भररस्त्यात एकमेकांवर उगारल्या तलवारी

इराणी वस्तीतील काही लोक पोलिसांचे खबरी असून त्यांच्या माहितीवरून या आरोपींना पकडल्याचा या सर्वांना संशय होता. त्या संशयातून एका गटानं दुसऱ्या गटावर हल्ला केला.

    कल्याण, 26 एप्रिल : कल्याण जवळच्या आंबिवली इराणी वस्तीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हणामारीचा ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (वाचा-पुणे तिथे काय उणे! 20 किमीपर्यंत मोफत रुग्णवाहिका सेवा, शहरात होतंय कौतुक) कल्याण परिसरातील आंबिवलीमधील इराणी वस्तीमध्ये सोनसाखळी हिसाकावणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. पोलिसांनी अनेकदा या वस्तीतून अनेक चोरट्यांना अटकही केली आहे. दुसरीकडं पोलिसांना याठिकाणी गुंडांच्या हल्ल्याला सामोरंही जावं लागलं आहे. सोमवारची घटनादेखिल पोलिसाच्या समोरच घडली आहे. पोलिस असल्यामुळं अनर्थ टळला गेला अथवा मोठी घटना घडण्याची शक्यता होती. पोलिसांनी इराणी वस्तीमधील बऱ्याच आरोपींना गेल्या एका वर्षामध्ये पकडलं आहे. खडकपाडा पोलिसांच्या मदतीनं महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील फरार आरोपींचा यात समावेश आहेत. जवळपास 22 आरोपींना अटक झाल्यानं या वस्तीतील एक गट नाराज होता. इराणी वस्तीतील काही लोक पोलिसांचे खबरी असून त्यांच्या माहितीवरून या आरोपींना पकडल्याचा या सर्वांना संशय होता. त्या संशयातून एका गटानं दुसऱ्या गटावर हल्ला केला. त्यात थेट तलवारींनी हल्ला करण्यात आला. यात तीन ते चार जण जखमी झाले. (वाचा-वडिलांचे छत्र हरपले, सांभाळ करतो म्हणून नातेवाईकांनी मुलीला राजस्थानमध्ये विकले) घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळीं दाखल झाले. पोलिसांसमोरच या दोन गटांत वाद झाले. पण पोलिस असल्यानं प्रकरण निवळलं गेलं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मात्र परिसरात तणाव आणि भीतीचं वातावरण आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या