Home /News /mumbai /

मुद्यावरून गुद्यावर, लसीकरण केंद्रावर भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये राडा

मुद्यावरून गुद्यावर, लसीकरण केंद्रावर भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये राडा

हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी सुद्धा झाली. यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई, 08 मे : मुंबईमध्ये (Mumbai Corona cases) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. आता आरोप प्रत्यारोपाची लढाई मुद्यावरून गुद्यावर आली आहे. मुंबईतील लसीकरण केंद्रावर (corona vaccine centre) भाजप  आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी येथील स्पोर्स्ट कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आज सकाळी 11.30 च्या सुमारास कार्यक्रम पार पडला. पण यावेळी लस देण्यावरून भाजप भाजप आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर, भाजपच्या रंजना पाटील आणि शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी सुद्धा झाली. यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोण आहे अधिक सुंदर? या पाकिस्तानी अभिनेत्रीची तुलना होतेय अनुष्का शर्माशी त्यानंतर  भारती लव्हेकर या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहे. भाजपचे आमदार आणि नगरसेवक मनपाच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालतात, श्रेय लाटण्याचं काम करतात, असा आरोप शिवसेना नगरसेवक राजूल पटेल यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोविड लढाईचं कौतुक दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या  प्र्यत्नांबद्धल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्रयाकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसंच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असं सांगितलं. आता कोरोना रुग्णांसाठी मोबाइलवर बुक होणार खाटा; मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं APP यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत, त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: भाजप, शिवसेना

पुढील बातम्या