Tiktok व्हिडीओ तयार करताना हसल्याचा राग; तरूणावर चॉपरनं वार

टीकटॉक व्हिडीओ बनवताना वाद झाल्यानंतर मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 05:51 PM IST

Tiktok व्हिडीओ तयार करताना हसल्याचा राग; तरूणावर चॉपरनं वार

मुंबई, 03 जून : टिकटॉक व्हिडीओ तयार करताना जोरात हसल्याचा राग मनात धरून चौघांनी एकाला लोखंडी रॉड, चॉपरनं मारहाण केली. मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी अब्दुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मारहाणीचा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणाचा तपास आता पोलिस करत आहेत.चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

हे सारं प्रकरण मुंब्रामधील आहे. मंगळवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता फिर्यादी टेम्पो चालक युसूफ अकबर सलकीचा भाऊ अब्दुल्ला आणि त्याचे 2 मित्र बिल्डींगखाली उभे होते. तर, काही अंतरावर आरोपी आवेश, कैफ, मोहिश आणि अशरफ हे टिकटॉक व्हिडीओ तयार करत होते. त्याचवेळी अब्दुल्ला आणि त्याचे मित्र जोरात हसले. दोघंही आपल्यावर हसत असल्याचा समज करून आरोपी ओवेस, कैफ, मोहिश आणि अशरफ यांनी अब्दुल्ला याला बोलावले. त्यानंतर हसण्याचा जाब विचारला. त्यावर आम्ही आपसात हसत असल्याचं अब्दुल्लानं सांगितलं. पण, त्यानंतर देखील आरोपी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी अब्दुल्ला याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सारा प्रकार सुरू असताना अब्दुल्लानं युसूफला मदतीसाठी बोलावलं.


महात्मा गांधींबद्दलचं ट्वीट IAS निधी चौधरींना भोवलं; मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई

Loading...

मारहाणीत पडले 17 टाके

त्यानंतर चारही आरोपींनी युसूफला देखील मारहाण केली. यावेळी ओवेसने त्याच्या जवळच्या चॉपरने अब्दुलाच्या पोटाच्या बारगड्यांवर वार केला. यात अब्दुल्ला हा गंभीर जखमी झाला. शिवाय, युसूफही जखमी झाला. दरम्यान, अब्दुल्लाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आरोपी ओवेस याने धारदार शस्त्राने तर मोहिश याने लोखंडी रॉडने अब्दुलच्या डोक्यात प्रहार केले. मारहाणीत अब्दुलाला 17 टाके पडले आहेत.

गुन्हा दाखल

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी ओवेश, कैफ , मोहिश, अशरफ यांच्या विरोधात मुंब्रा पोलिसांनी भादंवि 323,324,326,34, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


VIDEO : गोपीनाथ मुंडेंचं नाव लावण्यावरून मुख्यमंत्री कुणाला म्हणाले करंटे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...