Home /News /mumbai /

'पुष्पा' स्टाईल केली ड्रग्सची तस्करी, पण मुंबई पोलिसांसमोर झुकावेच लागले!

'पुष्पा' स्टाईल केली ड्रग्सची तस्करी, पण मुंबई पोलिसांसमोर झुकावेच लागले!

 ओडिसा येथील नक्षल भागातून ही टोळी अंमली पदार्थ आणत होती आणि गाडीमध्ये लपवून देशभर विकत होती

ओडिसा येथील नक्षल भागातून ही टोळी अंमली पदार्थ आणत होती आणि गाडीमध्ये लपवून देशभर विकत होती

ओडिसा येथील नक्षल भागातून ही टोळी अंमली पदार्थ आणत होती आणि गाडीमध्ये लपवून देशभर विकत होती

मुंबई, 26 जानेवारी : मुंबई पोलिसांच्या (mumbai police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-drug squad) अशा एका टोळीचा पर्दाफाश केलाय जी टोळी “पुष्पा” सिनेमा (pushpa movie) स्टाईल अंमली पदार्थांची तस्करी करत होती. एक दोन नाही तर अशा अनेक गाड्यांच्या माध्यमातून ही तस्करी केली जात होती. पण, शेवटी मुंबई पोलिसांनी त्यांचे पितळ उघडे पाडलेच. “पुष्पा” सिनेमात रक्त चंदनाची तस्करी करण्यासाठी सिनेमातील हिरो पुष्पाराज हा वेगळ्या युक्ती लढवत होता. कधी दुध पुरवठ्याच्या टाकीत, तर कधी तरकारीच्या ट्रकमध्ये तर कधी लग्नाच्या वऱ्हाडी चाललेल्या गाडीत रक्त चंदनाची तस्करी करत होता. अशाच प्रकारे तस्करी करणाऱ्या पण रक्त चंदनाची नाही तर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तेही “पुष्पा” सिनेमा स्टाईलने तस्करी करणाऱ्या एका टोळीचा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. (ऑनलाईन ऑर्डर केलेला चिकन रोल चावला आणि...; घास तोंडाबाहेर काढताच हादरली महिला) एका होंडा कंपनीच्या गाडीत अंमली पदार्थांची तस्करी केली जाणार आहे, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला या सापळ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी होंडा कंपनीची गाडी अडवली याच गाडीबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. गाडीची सर्व बाजूने तपासणी केली पण पोलिसांना काही अंमली पदार्थ सापडले नाहीत. पण जेव्हा पोलिसांनी गाडीचालकाची कसून चौकशी केली तेव्हा गाडीत अशा ठिकाणी अंमली पदार्थ लपवलेले सापडले ज्याचा कोणी विचार ही करु शकत नाही. गाडीची मधली सिट आणि डिकीच्या मागीस बाजूस मधल्या पोकळीत एक दोन नाही तर तब्बल 111 किलो गांजा लपवला होता. ज्याची बाजारात किंमत 28 लाख 75 हजार रुपये आहे. ओडिसा येथील नक्षल भागातून ही टोळी अंमली पदार्थ आणत होती आणि गाडीमध्ये लपवून देशभर विकत होती. सुरुवातीला ही टोळी मोठ्या गाड्यांचा वापर करुन अंमली पदार्थांची तस्करी करत होते पण पोलिसांना टोळीचे गुपित माहिती पडल्याने ही टोळी छोट्या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी करु लागली. कधी गाडीच्या डिकीतील पोकळीत, कधी गाडीच्या खालीच्या भागात, कधी इंटीरीअरमध्ये लपवून ही टोळी अंमली पदार्थाची तस्करी करत होती. (Phone Charging करतानाही खबरदारी महत्त्वाची, काय आहे कारण आणि वापरा या टिप्स) ठाणे जिल्ह्यात राहणारा इमरान अंसारी आणि मुंबईत राहणारा सलिम शेख हे दोघे या टोळीचे प्रमुख होते. ज्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पण, या दोघांचाही एक बाॅस आहे जो नेपाळ भागात लपून बसला आहे, ज्याचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. हा लपून बसलेला बाॅस ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख असल्याचे बोलले जात आहे. हा कितीही लपून बसला तरी त्याला एक दिवस शोधून काढणार असा चंगच पोलिसांनी बांधला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai police

पुढील बातम्या