PMC बँकेवर रिझव्ह बँकेने घातले निर्बंध; खातेधारकांमध्ये उडाली खळबळ!

PMC बँकेवर रिझव्ह बँकेने घातले निर्बंध; खातेधारकांमध्ये उडाली खळबळ!

रिझव्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँके(Punjab and Maharashtra Cooperative Bank)वर निर्बंध लादले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर: रिझव्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँके(Punjab and Maharashtra Cooperative Bank)वर निर्बंध लादले आहेत. RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भात रिझव्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे आर्थिक परिस्थिती पाहूनच हा निर्णय घेतला आहे. RBIने बँकिंग नियमन कायदा कलम 35 अ नुसार ही कारवाई केली आहे. PMC(PMC Bank) बँकेतील व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याच सांगत पुढील 6 महिने सर्व व्यवहारावर निर्बंध घालण्यात आल्याच RBIने पत्रात म्हटले आहे. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. या बँकेचे राज्यात 135 शाखा आहेत या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.

खातेदारांवर निर्बंध काय?

> एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.

> म्हणजे 6 महिन्यात केवळ 6 हजार रुपयेच काढता येतील.

> तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येतील.

> जर तुम्ही पीएमसी बँकेचं कर्ज घेतलं असेल, तर तुमच्या हप्त्याची रक्कम खात्यात वळती होईल

> कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात.

पीएमसी बँकेवर कोणकोणते निर्बंध?

> रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही

> जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही

> बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही

> नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत

> बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही

> निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील, त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

बँकेने दिले हो स्पष्टीकरण

RBIने घातलेल्या निर्बंधानंतर बँकेचे संचालक जॉय थॉमस यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही अनियमितता पुढील सहा महिन्यात दूर करण्याचे आदेश बँकेने दिले आहेत. बँकेवर आलेल्या संकटातून नक्कीच बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या काळात बँकेच्या ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल थॉमस यांनी दिलगिरी व्यक्तकेली आहे आणि सर्वांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bankPMCrbi
First Published: Sep 24, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading