• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • पुण्यातील मुलीचा VIDEO VIRAL, रडत रडत मागितली मुख्यमंत्र्यांची माफी आणि म्हणाली...

पुण्यातील मुलीचा VIDEO VIRAL, रडत रडत मागितली मुख्यमंत्र्यांची माफी आणि म्हणाली...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

  • Share this:
मुंबई, 6 जून : पुण्यातील विश्रांतवाडीतील विश्रांत सोसायटीत राहाणाऱ्या शिंदे कुटुंबांना सध्या सुखद धक्का बसला आहे. अंशिका शिंदे या तीन वर्षाच्या लहान मुलीचा एक व्हिडीयो व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिने लॉकडाऊन दरम्यान आईने सांगितलेल्या सूचनांचं उल्लंघन केलं. त्यानंतर तिच्या आईने तिला सूचनांचं पालन करण्यासाठी दम दिला होता. त्यावेळी छोट्या अंशिंकाने रडत आपण पुन्हा अशी चूक करणार नाही असं सांगितलं. मात्र माय लेकींच्या या संस्कार शिकवणीत अंशिकाच्या आईने अंशिकाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय सूचना केल्यात आणि त्यांचं कसं पालन करायचं याची आठवण करून दिली. यावेळी छोट्या अंशिकाने आपण मोदींचं आणि उद्धव काकांचं ऐकणार असं सांगितलं. तसेच आपल्याला उद्धव काका खूप आवडतात असंही तिने आपल्या आईला सांगितलं. छोट्या अंशिकाचा हा व्हिडीयो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंतही पोहचला. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या छोट्या चहातीला फोन करून सुखद धक्का देत दिलासा दिला. तसंच आई-बाबांच्या सूचनांचं पालनही करायला सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published: